Sat, Dec 15, 2018 14:42होमपेज › Ahamadnagar › दोघा ज्येष्ठ मित्रांचा एकाच दिवशी मृत्यू 

दोघा ज्येष्ठ मित्रांचा एकाच दिवशी मृत्यू 

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 11:49PMराहुरी : प्रतिनिधी

बालपणापासून ते अखेरच्या श्‍वासापर्यंत एकमेकांच्या सुख, दुःखात सदैव सोबत राहिलेल्या दोन ज्येष्ठ मित्रांचे एकाच दिवशी देहावसान झाल्याने त्यांची ही दोस्ती मृत्यूनंतरही अजरामर ठरणारी आहे. हनुमंता भगवंता ढोकणे (वय 87) व रंगनाथ गेणू दुशिंग (वय 90) असे या मित्रांची नावे असून उंबरे गावात या दोस्तांचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

लहानपासून एकमेकांच्या हातात हात घेत ढोकणे व दुशिंग हे संपूर्ण आयुष्य मित्रत्वात जगले. दोघांच्या मैत्रीबाबत उंबरे गावात नेहमीच कुतुहूल वाटत होते. शेतकरी कुटुंबातील खडतर परिस्थीतीवर मात करून दोघांनी आपले सुखी संसार फुलविले होते. दोघांच्याही जीवनात अनेक सुख, दुःखाच्या घटना घडल्या असताना एकमेकांची साथ देणार्‍या या दोन मित्रांच्या माध्यमातून युवापिढी घडली आहे. अशा या दोन मित्रांनी आपापले देहत्यागही एकाच दिवशी केल्याने उंबरेकरांच्या अश्रूंना बांध फुटताना दिसत आहे. 

उंबरे येथील कै. दुशिंग यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी असा परिवार असून ते उंबरे सेवा संस्थेचे सचिव राजेंद्र दुशिंग व छगन दुशिंग यांचे वडील होत. कै. हनुमंता ढोकणे यांच्या पश्‍चात मुलगा, दोन मुली असून ते दत्तात्रय ढोकणे यांचे वडील होत.