Fri, Jul 19, 2019 00:59होमपेज › Ahamadnagar › कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार

कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 10 2018 11:34PMनेवासा : प्रतिनिधी 

नगर-औरंगाबाद महामार्गावर सोमवारी मध्यरात्री स्विफ्ट कार व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. तर दोनजण जखमी झाले आहेत.

सोमवारी मध्यरात्री नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा शिवारात नगरच्या दिशेने चाललेल्या कंटेनरला (एमएच20 एटी 8783) मागून येणार्‍या स्विफ्ट कारची (एमएच.-20 डीजे-1143) जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील लक्ष्मण राजाराम हिवाळे (33) व संतोष वालचंद सोनवणे (30, दोघे रा. रांजणगाव ता.गंगापूर जि. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश देविदास जाधव (30) व मनोज गोरक्षनाथ सोनवणे (22, दोघे रा. रांजणगाव ता.गंगापूर जि.औरंगाबाद) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. कंटेनर खाली गुंतलेली कार बाहेर काढण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागला.

पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, कॉन्सेबल सुहास गायकवाड, संदीप दरंदले, संभाजी गर्जे, देवा खेडकर, राजेंद्र सुद्रीक यांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलविले.

Tags : ahmednagar news, Two killed, car and container accident,