Tue, Apr 23, 2019 23:54होमपेज › Ahamadnagar › गोमांस वाहतूकप्रकरणी दोघांना अटक

गोमांस वाहतूकप्रकरणी दोघांना अटक

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:19PMनेवासा: प्रतिनिधी 

नॅनो कारमधून औरंगाबादकडे गोमांस घेवून जात असतांना नेवासे पोलिसांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाटा (ता. नेवासा) येथे सापळा रचून दोघांना अटक केली आहे.  याप्रकरणी 1 लाख 1800 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जपत केला आहे.

नेवाशाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना गुप्त बातमी मिळाली. उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाटा (ता. नेवासा) येथे साध्या वेशातील पोलिसांचा सापळा रचला. औरंगाबादच्या दिशेने जात असलेले नॅनो कार (एमएच- 20 बीवाय 3512)  हे वाहन अडवून तपासणी केली असता या वाहनात 120 किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी गोमास व नॅनो कार असा 1 लाख 1800 रुपयांचा मुद्देमासह शेख समीर शेख शाकिर (वय 45,रा. सिमस नगर शहानूरवादी औरंगाबाद) व शेख रियाज शेख अब्दुल (वय 38, रा. नूतन कॉलनी, औरंगाबाद) यांना ताब्यात घेलते आहे.