Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Ahamadnagar › टैप्यासह दोघांना केले जेरबंद : नगर

टैप्यासह दोघांना केले जेरबंद : नगर

Published On: May 23 2018 1:06AM | Last Updated: May 22 2018 10:59PMनगर : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून शस्त्राच्या धाकाने युवतीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी टैप्या ऊर्फ जैद रशीद शेख व सना ऊर्फ अरबाज हरुल शेख (दोघे रा. मुकुंदनगर) या दोघांना कँप पोलिसांनी अटक केली आहे. काल (दि. 22) आलमगीर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

मुकुंदनगर परिसरातून युवतीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी आलमगीर परिसरात येणार असल्याची माहिती कँप पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड, संजय कवडे, कर्मचारी राजेंद्र सुद्रिक, ज्ञानेश्‍वर शिंदे आदींच्या पथकाने आलमगीर येथे सापळा रचला. तेथून टैप्या व अरबजा या दोघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (क्र. एमएच 16, बीबी 3131) हस्तगत करण्यात आली आहे.यातील आरोपी टैप्या ऊर्फ जैद रशीद सय्यद याच्याविरुद्ध भिंगार कँप व कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत बलात्कार, अपहरण, दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारहाण आदी गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास कँप पोलिसांकडून सुरू आहे.