Fri, Apr 19, 2019 12:30होमपेज › Ahamadnagar › वाळू माफिया ‘राज’; तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्‍न

वाळू माफिया ‘राज’; तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्‍न

Published On: Dec 13 2017 5:54PM | Last Updated: Dec 13 2017 6:47PM

बुकमार्क करा

पारनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील कोहकडी येथे कुकडी नदीपात्रात बेकायदा वाळू विरोधात कारवाई केल्याच्या रागातून तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी त्‍यांना बाजूला ओढल्याने सागरे मोठया दुर्घटनेतून बचावल्या आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अद्यापही सागरे यांच्यासह कारवाईसाठी गेलेले पथक घटनास्थळीच असून, पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे घटनेचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

सागरे यांच्यावर हल्ला करण्याबरोबरच वाळूतस्करांनी पथकातील काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक करीत मारहाणही केली.  जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक होईपर्यंत घटनास्थळ न सोडण्याचा निर्धार तहसिलदार सागरे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खाणकर्म अधिकारी यांना या घटनेची माहीती देण्यात आल्यानंतर त्यांनीही कानावर हात ठेवल्याची माहीती असून, जिल्हाधिकारी अभय महाजन हे रजेवर गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील वाळूतस्करी लक्ष्य करण्यात आली व त्यातूनच हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.