Tue, Mar 19, 2019 09:38होमपेज › Ahamadnagar › माझे राजकारण संपविण्याचा प्रयत्न

माझे राजकारण संपविण्याचा प्रयत्न

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 9:50PMकरंजी : वार्ताहर 

सलग पाच वेळा वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर निवडून येणे, ही सोपी गोष्ट नाही. चुकीचे वागलो असतो, चुकीचे केले असते, तर सर्वसामान्य जनतेने कधीच घरी बसवले असते. माझ्याकडे कोणताही साखर कारखाना नाही, मोठा उद्योग नाही, केवळ चोवीस तास जनतेच्या सुख, दुःखात सहभागी होऊन विकासकामे मार्गी लावतो. त्यामुळे विरोधकांनी माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप आ. शिवाजी कर्डिले यांनी केला. 

तिसगाव (ता. पाथर्डी) येथे उपसरपंच फिरोज पठाण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात आ. कर्डिले बोलत होते. यावेळी तिसगावातील दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, दीपक लांडगे, तालुका विकास अधिकारी सुभाष वळढेकर, माजी नगरसेवक संजय भागवत, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. आ. कर्डिले म्हणाले तिसगावकरांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचे काम केले आहे. तिसगावच्या र्ईदगाह मैदानाच्या विकास कामासाठी दहा लाखांचा निधी दिला जाणार आहे. यापूर्वी देखील तिसगावातील रस्ता, स्मशानभूमी संरक्षण भिंत, काँक्रिटी बंधारा, सभामंडपासाठी निधी दिला आहे.  राजकारण करताना कधीही जात धर्म पाहिला नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. गुंडगिरी, दडपशाही कधीच केली नाही. पाचवेळा पाच पक्षांच्या चिन्हांवर निवडून आलो. हे लोकांचे प्रेम आहे.