Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Ahamadnagar › सरपंचपदासाठी तिरंगी लढत

सरपंचपदासाठी तिरंगी लढत

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 12:14AMनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील वडगाव गुप्‍ता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी तर सदस्यपदाच्या 15 जागांसाठी दुरंगी लढत होणार आहे. ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.वडगाव गुप्‍ता ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी 47 तर सरपंचपदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (दि.16) शेवटचा दिवस होता.सरपंचपदासाठी तीन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात गणेश गिते, विजय शेवाळे व सुदाम सातपुते यांच्यात सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या 15 जागांसाठी एकूण 47 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 17 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.त्यामुळे निवडणूक रिंगणात आता 30 उमेदवार  उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक वार्डात आता दुरंगी लढत होणार आहे.निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हाचे वाटप देखील केले गेले आहे.

प्रभाग 1(अ) उमेदवार-केशव शिंदे, दीपक शिंदे, (ब)-चंद्रकला गिते, सुनीता डोंगरे.  (क)- ज्योती आढावा, पूजा गव्हाणे, प्रभाग-2 (अ) गणेश डोंगरे, गोवर्धन शेवाळे, (ब)- बबन कोर्‍हाळे, संजय गव्हाणे, (क)- मंगल घाडगे, सुरेखा बांगर, प्रभाग 3 (अ) - सारीका पिंपळेे, ज्योती शेवाळे, (ब)-उमेश डोंगरे, संजीव ढेपे, (क)-अंजना गुडगळ, भाग्यश्री शेवाळे, प्रभाग 4 (अ)-बाबासाहेब गव्हाणे, गुलाब गिते, (ब) -जालिंदर डोंगरे, जगन्‍नाथ शेवाळे, (क)- मिना गव्हाणे, मुक्‍ताबाई डोंगरे, प्रभाग 5 (अ) मंगल चांदणे, विद्या शिंदे, (ब)- चंद्रकला निकम, भानुबाई निकम, (क)-हुसेन सय्यद, भानुदास सातपुते आदी 30 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावित आहेत. 

सरपंचपद हे ओबीसी व्यक्‍ती प्रवर्गासाठी राखीव आहे. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या उमेदवारांना गावातील सर्वच 4 हजार 978 मतदारांची मनधरणी करावी लागणार आहे. सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. मतदान 27 मे रोजी होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी नऊ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे वडगाव गुप्‍ता गावात प्रचाराला चांगलाच जोर येणार आहे.