Thu, Nov 15, 2018 20:10होमपेज › Ahamadnagar › आदिवासी विद्यार्थी इंग्रजी शाळांत

आदिवासी विद्यार्थी इंग्रजी शाळांत

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:30AMनगर : प्रतिनिधी

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरी वर्गासाठी प्रवेश सुरु झाले असून, दि.15 मे 2018 अखेर अर्ज भरण्याची मुदत असल्याची माहिती  एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प राजूरचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी दिली.

या योजनेतंर्गत प्रवेश घेऊ इच्छिणारे पालक शासकीय अगर निमशासकीय नोकरदार नसावा. शाळा निवडीनंतर कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलून मिळणार नाही. प्रवेशासाठी अर्ज प्रकल्प कार्यालय, राजूर येथे उपलब्ध असल्याचे प्रकल्प अधिकार्‍यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.