Thu, Jun 20, 2019 00:54होमपेज › Ahamadnagar › ‘हल्लाबोल’ निवडणुकीतील तिकिटे जाहीर करण्यासाठी : बबनराव पाचपुते

‘हल्लाबोल’ निवडणुकीतील तिकिटे जाहीर करण्यासाठी : बबनराव पाचपुते

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:15PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी अगोदर डल्ला मारला आणि आता सत्ता नसल्यामुळे ते बेचैन व अवस्थ झाले आहेत. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी त्यांचा हल्लाबोल सुरू केला आहे. हा हल्लाबोल शेतकर्‍यांच्या हितासाठी नव्हता, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यासाठी होता, असा टोला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलताना मारला.

पाचपुते पुढे म्हणाले, काष्टी व श्रीगोंदा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला, हे खरे आहे. पण ज्या मंत्रिमंडळात अजित पवार होते, त्याच मंत्रिमंडळात मी होतो. त्यामुळे आमचेही काहीतरी योगदान असेल ना!

बारामतीची जागा गेली तरी चालेल. पण श्रीगोंद्याची जागा जाऊ देणार नाही, असे म्हणणारांनी ज्यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील महादुष्काळ पडला. त्यावेळी एकत्र येऊन का योगदान दिले नाही. पैसे आणि बोकड वाटून निवडून आलेल्यांना  माझ्या प्रवचनावर बोलण्याचा अधिकार नाही. अन्यथा एक दिवस या टीकेची  किंमत मोजावी लागेल.

आपण शक्तिप्रदर्शन करणार का? असे विचारले असता, मी दररोज लोकांच्या प्रश्नावर काम करीत आहे. त्यामुळे आपणास शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही, असेही पाचपुते म्हणाले. यावेळी बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, बापू गोरे, सुनीता शिंदे, डॉ. भाऊसाहेब होले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मी शरद पवार यांचा एकलव्य!  

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्या विषयी  मनात आजही आदर आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना खूप काही केले आहे, हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना माहीत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलणे बरोबर नाही. ते माझ्यासाठी आदरणीय असून, मी त्यांचा एकलव्य आहे.