होमपेज › Ahamadnagar › मराठा मोर्चात मोबाईल चोरणारे तिघे जेरबंद

मराठा मोर्चात मोबाईल चोरणारे तिघे जेरबंद

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 11:46PMसंगमनेर : प्रतिनिधी

येथील सकल मराठा क्रांती मोर्चातील गर्दीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी एका पत्रकारांसह  तिघांचे  मोबाईल आणि खिशातील पाकिटे चोरून पोबारा केला. यावेळी पोलिसांनी एकाला मोठ्या शिताफीने पकडले, तर पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेले दोघे लोणीत मोबाईल चोरताना मात्र अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या मोर्चातील गर्दीचा फायदा उचलत अतिक आयूब शेख व सागर चंद्रकांत धिवर (रा. दोघेही श्रीरामपूर) यांच्यासह एक अल्पवयीन या तिघांनी निलेश भाऊसाहेब राहणे यांचा 43 हजारांचा  तसेच  पत्रकार सुखदेव सखाराम गाडेकर यांचा 7 हजार रुपयांचा मोबाईल, तसेच शॉन दीपक थोरात याचा 7 हजार चा मोबाईल जोशी हॉटेल समोरून चोरून पलायन केले होते. मात्र, या तिघातील एकास पोलिसांनी जागेवरच पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, दोघे लोणीच्या दिशेने पळून गेल्याचे सांगितले.

पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. अभय परमार यांनी  लोणीत सापळा लावून अतिक आणि सागर यांना चोरीच्या मोबाईलसह बस्थानकावरून ताब्यात घेतले.