Mon, Jan 27, 2020 12:32होमपेज › Ahamadnagar › विहिरीत उतरताना क्रेनचा वायररोप तुटून तीन जण ठार

विहिरीत उतरताना क्रेनचा वायररोप तुटून तीन जण ठार

Published On: Jun 17 2019 8:33PM | Last Updated: Jun 17 2019 8:33PM
गणोरे (अहमदनगर) : वार्ताहर  

विहिरीच्या खोलीकरणाच्या कामासाठी विहिरीत उतरत असताना अचानक क्रेनचा वायररोप तुटल्याने तीन कामगार ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आज, सोमवार (दि.१७) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बाळासाहेब शेळके (रा. देवठाण), गणेश कदम (रा. हिवरगाव आंबरे), नवनाथ शिंदे (रा. वडगाव, लांडगा) अशी या मृत कामगारांची नावे आहेत. 

अकोले तालुक्यातील रामहारी दगडु जोर्वेकर यांच्या देवठाण शिवारात विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते. यासाठी कामगारांना विहिरीत उतरण्यासाठी क्रेनव्दारे वायररोप लावण्यात आला होता. यावेळी मजुर विहीरीची कामे करत होती. या विहीरीचे काम सुरु असताना दुपारी मजुरांनी जेवण केले आणि विहिरीत उतरत असताना क्रेनचा अचानक वायररोप तुटला. यावेळी क्रेनच्या माडीत बसलेले हे तिघे मजुर खाली खडकावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.