Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Ahamadnagar › कोरेगाव भीमा : राहुल फटांगळे हत्‍येप्रकरणी तिघांना अटक 

कोरेगाव भीमा : राहुल फटांगळे हत्‍येप्रकरणी तिघांना अटक 

Published On: Jan 10 2018 7:29PM | Last Updated: Jan 10 2018 7:29PM

बुकमार्क करा
अहमदनगर : पुढारी ऑनलाईन

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारत मृत्‍यू झालेल्‍या राहुल फटांगडेच्या हत्‍येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना अहमदनगरहून ताब्‍यात घेतल्‍याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे या तिघांची नावे जाहीर करता येणार नसल्‍याचेही पोलिसांनी स्‍पष्‍ट केले.  

अटक करण्यात आलेल्‍या तिघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मारेकऱ्यांचा शासनाने शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलन करून सरकारला धारेवर धरण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर-पाटील यांनी आजच दिला होता.