Wed, Nov 14, 2018 18:41होमपेज › Ahamadnagar › चोवीस तासात मुद्देमाल जप्त

चोवीस तासात मुद्देमाल जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीगोंदा :  प्रतिनिधी 

मकाच्या पोत्यासह चोरी गेलेला ट्रक बेलवंडी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेत ट्रकचालकास अटक केली आली. याबाबत बेलवंडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  देविदास सोनवणे यानी आपल्या मालकीचा ट्रक(एमएच.16. क्यू 7149) मधून मकाने भरलेली 258 पोती पुणे येथे पाठवली होती. मात्र, ठरलेल्या वेळेत ट्रक पूणे येथे पोहचला नाही. सोनवणे यांनी ट्रकची शोधाशोध केली मात्र ट्रक सापडला नाही. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिस निरीक्षक राजेंद्र पडवळ यानी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ट्रक चालक राजाभाऊ शेंडगे (रा. श्रीगोंदा)याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता ट्रक उक्कडगाव शिवारात एका वितरिकेच्या बाजूला लपवला असल्याची माहिती दिली. पोलिस पथकाने तो ट्रक तात्काळ ताब्यात घेतला. ट्रकमधील 288 मका पोत्यांपैकी 130 पोती चोरी गेली आहेत.