Sat, Jan 19, 2019 08:06होमपेज › Ahamadnagar › नातेवाईकांची आरोपींना मारहाण

नातेवाईकांची आरोपींना मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील अश्‍विनी किसन कांबळे या युवतीचा पेटवून देऊन खून केला. या घटनेनंतर अश्‍विनीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यातच आरोपींना मारहाण केली. त्यानंतर अश्‍विनीवर तब्बल 30 तासांनी शोकाकूल वातवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अश्‍विनी कांबळे या युवतीस एकतर्फी प्रेमातून तिच्या घरासमोर राहणार्‍या शैलेश बारकू अडसुळ व किशोर छगन अडसुळ या दोघांनी पेटवून दिले होते. त्यानंतर नगर येथे जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असता तिचे बुधवारी (दि.28) पहाटे पाच वाजता निधन झाले. त्यानंतर सकाळी कोरेगाव येथे अश्‍विनीचा मृतदेह आणण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय अश्‍विनीवर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना पोलिस कोठडीत घेऊन जात असताना अश्‍विनीच्या नातेवाईकांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणार्‍या तिघांना अटक केली होती. हा सर्व प्रकार बुधवारी रात्री सात वाजता घडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 

त्यानंतर अटक करण्यात आलेल्या तिघा नातेवाईकांना सोडल्या शिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र पोलिसांनी आरोपींना सोडले नाही. त्यामुळे  काल (दि. 29) मयत अश्‍विनीवर 30 तासांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी

अश्‍विनी कांबळे हिला एकतर्फी प्रेमातून जाळून ठार मारणारे शैलेश अडसुळ व किशोर अडसुळ या दोघांना काल कर्जत येथील न्यायालयात हजर केले असता, सहदिवानी न्यायधीश व न्यायदंडाधिकारी धनाजी पाटील यांनी 6 दिवसांची पोलिस कोठडी दिली.पोलिसांनी किशोर अडसुळ यास कोरेगाव येथून राहत्या घरातून व शैलेश अडसुळ यास पुण्यातून अटक केली. या दोघांना बुधवारी रात्री सात वाजता कर्जत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालाच्या कार्यालयात आणले असता अश्‍विनीच्या संतप्त नातेवाईकांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर हल्ला करणारे श्रीकांत उबाळे, तुषार उबाळे व सचिन उबाळे यांना अटक केली. या तिघांनाही काल न्यायालयात हजर केले असता, सहदिवानी न्यायधीश व न्यायदंडाधिकारी धनाजी पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.  

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, relatives, beat, accused


  •