Fri, May 24, 2019 03:00होमपेज › Ahamadnagar › के. के. रेंजला 1 इंच जागा जाऊ देणार नाही

के. के. रेंजला 1 इंच जागा जाऊ देणार नाही

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

नगर तालुक्यातील देहरे परिसरातील शेतकर्‍यांचा सर्वात ज्वलंत प्रश्‍न के. के. रेंजचा आहे. मात्र मी तुम्हाला शब्ध देतो, की या भागातील एक इंचही जागा के. के. रेंजला जाऊ देणार नाही. त्यासाठी रणगाड्यासमोर आडवा पडणारा पहिला मी असेल. पद्मभूषण अण्णा हजारं यांच्या माध्यमातून हा प्रश्‍न आपण सोडवू असा विश्‍वास नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

नगर तालुक्यातील  शिंगवे नाईक, नांदगाव व इस्लामपूर येथील नीलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखांचे उद्घाटन लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मांजरसुंभ्याचे सरपंच जालिंदर कदम, राजकुमार आघाव, संतोष वराळे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे शिंगवे येथील अध्यक्ष जावेद सय्यद, अमोल चौधरी, महेंद्र कोळपकर, अनिल डोळस, इस्लामपूरचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, राहुल बारकडे, नितीन बर्डे, राहुल धामणे, नांदगावचे अध्यक्ष शुभम फंड, पप्पू वेताळ, मच्छिंद्र पुंड, बाबासाहेब फंड यांच्यासह पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, राजेंद्र शिंदे, ठकाराम लंके, प्रा. सुहास पाखरे आदींसह मोठ्या संख्येने महिला व तरुण वर्ग उपस्थित होता. 

लंके म्हणाले की, लष्कराने रिकामी पडलेली शेकडो एकर गायरान जमीन घ्यावी. पण या भागातील बागायती जमीन देणार नाही. या भागातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू . लंके स्वतः इतिहास घडवतो.दुसर्‍याच्या इतिहासावर रेघोट्या ओढत नाही. घराणेशाहीच्या विरोधात लढण्याचा लहानपानापासून छंद आहे.त्यामुळेच मी 24 तास व 365 दिवस जनतेच्या सेवेत असतो. व 100 टक्के समाजकार्य करतो, असे लंके म्हणाले. यावेळी त्यांनी  नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला.

सरपंच कदम म्हणाले, जनतेचे अश्रू पुसण्याचे काम लंके प्रतिष्ठान करते व तळागाळातील लोकांचे प्रश्‍न सोडवते. त्यामुळे लंके प्रतिष्ठानच्या मागे या भागातील गावे भक्कम पणे उभी आहेत. देहरे गटात विकासाला खीळ बसली असून सामान्य माणसाला सत्ताधारी पुढे येऊन देत नाही. पण आता ही परिस्थिती बदलणार आहे. जनसंपर्क आणि लोकांच्या सुख दु:खात सहभागी होत असल्याने माझ्या मागे सर्वसामान्य जनता आहे. ती नीलेश लंकेच्या पाठीशी उभी करणार आहे. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रम यशश्‍वीतेसाठी युवकांनी पुढाकार घेतला.