Tue, Nov 19, 2019 12:37होमपेज › Ahamadnagar › घोड नदीपात्रात छापा टाकून ५६लाखांचा मुद्देमाल जप्त

घोड नदीपात्रात छापा टाकून ५६लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Jul 12 2019 1:42AM | Last Updated: Jul 12 2019 12:30AM
श्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील दानेवाडी येथील घोड नदीपात्रात बेलवंडी पोलिसांनी काल सायंकाळी छापा टाकत अवैध वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक व अठरा ब्रास वाळूसाठा असा 56 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाच वाळूतस्करांना अटकही करण्यात आली आहे. 

 दानेवाडी येथील घोड नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना मिळाली. त्यानुसार पोलिस कर्मचारी देशमुख, पठारे, नंदकुमार पठारे, क्षीरसागर, गुंड, लोंढे यांनी काल सायंकाळी नदीपात्रात छापा टाकून वाळू वाहतूक करणार्‍या सहा ट्रक व त्यामधील अठरा ब्रास वाळूसाठा जप्त केला.

या कारवाईत वाळूतस्कर कचरू गायकवाड (रा. रामलिंग शिरूर),  द्यानदेव विटकर (रा. बाबूरावनगर, शिरूर), गणेश सांगळे (रा. तरडोबाचीवाडी, शिरूर), संतोष वाळके (रा.बाभूळसर शिरूर), शाम राठोड (तरडोबाचीवाडी, शिरुर), सतीश साबळे (रा. शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे.  वरील आरोपींविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बेलवंडी पोलिस करीत आहेत.