Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Ahamadnagar › सोनगावच्या सरपंचांचे पद चौथ्या अपत्याने रद्द 

सोनगावच्या सरपंचांचे पद चौथ्या अपत्याने रद्द 

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:19AMराहुरी  : प्रतिनिधी

तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे चौथ्या अपत्यामुळे पद रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

सोनगाव ग्रामपंचायतीची सन 2017 मध्ये निवडणूक झाली होती. यामध्ये सरपंचपदासाठी राजू चांगदेव अनाप हे उभे होते. त्यांची जनतेतून सरपंचपदी निवड झाली होती. मात्र, निवडणुकीदरम्यान अर्ज भरताना अपत्य माहितीचे घोषणापत्र द्यावे लागते. त्याप्रमाणे सरपंचांनी तहसीलदारांसमोर घोषणापत्र करून देताना त्यांनी हयात असलेल्या अपत्यांची संख्या 3 अशी नमूद केलेली आहे. त्याचप्रमाणे 13 सप्टेंबर 2000 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या काहीनाही व 12 सप्टेंबर 2001 नंतर एकूण हयात मुलांच्या संख्येत भर पडून ती दोन पेक्षा जास्त झाल्यास मी उपरोक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरेल, असे प्रतिज्ञापत्र करून दिले आहे. मात्र सरपंचांनी प्रतिज्ञापत्रात खोटा मजकूर दिला आहे. 

सरपंच अनाप यांना 2001 पुर्वी तीन अपत्य आहेत तर 20 जानेवारी 2002 रोजी चौथे अपत्य म्हणून मुलगा आहे.यामुळे त्यांनी शासनाची फसवणूक केल्याची तक्रार भाऊसाहेब अंत्रे यांनी केली होती. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी सुनावणी घेताना राजू अनाप यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला.