Sun, Aug 18, 2019 15:27होमपेज › Ahamadnagar › दूध संकलनाचा आकडा वाढू लागला

दूध संकलनाचा आकडा वाढू लागला

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 1:36AMनगर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढ आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी दूध घालणार्‍या शेतकर्‍यांची संख्या आता हळूहळू वाढू लागली. त्यामुळे दूध संकलनाचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी दुपारपर्यंत 12 लाख 65 हजार 652 विटर दूधाचे संकलन झाले आहे. दुसरीकडे दरवाढीसाठीचे आंदोलन देखील सुरुच आहे.

दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शासनाकडून तात्काळ मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार सोमवारपासून (दि.16) मुंबई, ठाणे या शहरांना जाणारा दूधपुरवठा रोखण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात पहिल्या दिवशी सहकारी दूध संस्था तसेच खासगी संस्थांनी भीतीपोटी दूध संकलन केले नव्हते. त्यामुळेे पहिल्या दिवशी एक थेंब देखील दूधाचे संकलन झाले नव्हते. 

दूध संकलन करणार्‍या संस्थांना संकलन तसेच वितरणवेळी पोलिस संरक्षण दिले जाईल, अशी हमी जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे दुसर्‍या दिवशी (दि.17) मात्र सकाळपर्यंत सात दूधसंस्थांनी जवळपास तीन लाख लिटर दूधाचे संकलन केले. दूध वाहतूक करणार्‍या गाड्यांना पोलिस संरक्षणात धावू लागल्या आहेत.  तिसर्‍या दिवशी (दि.18) देखील पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने, जिल्हाभरातील सहकारी व खासगी दूध संस्थांनी जवळपास 12 लाख 65 हजार 652 लिटर दूधाचे संकलन केले आहे. संकलन केलेल्या दूधाची वाहने  पोलिस बंदोबस्तात धावू लागले आहेत. दुसरीकडे अनेक ठिकाणी शासनाच्या विरोधात दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले जात आहे.

या आंदोलनामुळे जिल्हाभरात काल (दि.18) किरकोळ प्रकार सोडता कोणताही अनुचित प्रकार  घडला नाही. दूध संकलन ठिकाणी वा दूध वाहतूक करणार्‍या गाड्यांना संरक्षण दिले गेले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

दूध संस्था आणि संकलन लिटरमध्ये 

नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संस्था कोपरगाव - 103000, संगमनेर सहकारी दूध संघ संगमनेर 205000, अकोले सहकारी दूधसंघ 55000, नेवासे सहकारी दूध संघ सोनई 18772, श्रीरामपूर जिल्हा दूध  संघ बाभळेश्‍वर 17181, राहाता  सहकारी दूध संघ राहाता 15000, श्रीगोंदे  सहकारी दूध संघ श्रीगोंदे 8500, श्रीरामपूर सहकारी दूध संघ 1700, मळगंगा निघोज 190000, प्रभात 105000, एस.आर. थोरात 55000, पतंजली खडकाफाटा 13799, व्ही.आर.एस. नेवासे - 20000, दैवत डेअरी कावडगाव  20000, नवनाथ, टाकळीमिया 12000, सात्रळ डेअरी 38000, चैतन्य 20000, ओम साई, सुगाव 17000, जीवन सुपे6600, थोरात सुपे 10000, साई मिल्क, सुपे2000, योगिराज, सुपे - 8000, भैरवनाथ 7000, डेरे, पाडळी आळे 2600, स्वदर्शन, बाभळेश्‍वर 15000..