Thu, Mar 21, 2019 15:24होमपेज › Ahamadnagar › शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली

शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:12PMनगर : प्रतिनिधी

शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. लुटमार आणि चोरीच्या घटनांमुळे शहर असुरक्षित बनले आहे. पोलिसांचा वचक न राहिल्याने गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा घालून नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी भाजपा वकील आघाडीने केली आहे.या संदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राहुल रासकर, व्यापारी आघाडीचे अविनाश साखला, संदीप पवार, नितीन जोशी, सुजित खरमाळे, जालिंदर शिंदे, अभिषेक शिंदे, अ‍ॅड.भारत रासकर, निखिल सोनवणे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,  शहरासह उपनगरी भागांत चोरांची दहशत निर्माण झाली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविणे, पाळत ठेवून हातात असलेली पैशांची बॅग पळवून नेणे, रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांच्या गळ्याातील चेन, मोबाईल, पर्स लुटणे, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोर्‍या होत आहेत.

भाजपा वकील आघाडी व राऊ युवा प्रतिष्ठानच्या वतीने मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात स्वखर्चाने कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे या परिसरात चोर्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. चितळरोड, मार्केटयार्ड, बंगाल चौकी, रेल्वे स्टेशन, बुरुडगाव रोड, केडगाव, गंजबाजार, कापडबाजार, गुलमोहर रोड  येथील बंद पोलिस चौक्या सुरू कराव्यात. शनिवार, रविवार, मंगळवारी  गंजबाजार, कापडबाजार, सराफबाजार या ठिकाणी ग्राहकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या दिवशी या परिसरांमध्ये बंदोबस्त ठेवावाअशा मागण्या करण्यात आल्या आहेत.