Fri, Feb 22, 2019 04:28होमपेज › Ahamadnagar › पतीचे अनैतिक संबंध पत्नीने केले उघड

पतीचे अनैतिक संबंध पत्नीने केले उघड

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:44AMवांबोरी : वार्ताहर

पतीने शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलीशी गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार पत्नीने उघड केल्याने वांबोरीत खळबळ उडाली आहे.  

वांबोरी परिसरात राहणार्‍या एकाचे शेजारी राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबंध होते. त्यापासून या मुलीने एक वर्षाचा मुलाला जन्म दिला होता. याची कुणकूण लागल्याने  आपल्या पतीकडे पत्नीने अनेकदा जाब विचारला मात्र त्याने राग येवून आपणास  लाथाबुक्याने मारहाण केल्याचे ‘त्या’ पत्नीने फिर्याद म्हटले आहे.