Sat, Feb 16, 2019 15:17होमपेज › Ahamadnagar › राहुरीत उष्माघाताने तरुणाचा पहिला बळी

राहुरीत उष्माघाताने तरुणाचा पहिला बळी

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:46AMराहुरी : प्रतिनिधी 

उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे राहुरी शहरातील तरुणाचा उष्माघाताने मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला.

राहुरी शहरातील लोहार गल्ली परिसरात राहणारा मकरंद मधुकर कुमावत ( वय 28) हा तरुण काल दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घराबाहेर उभा असताना अचानक चक्कर येवून खाली कोसळला. यावेळी घाबरलेल्या मित्रांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात हलवले. प्राथमिक उपचारानंतर त्यास तातडीने नगर येथे रवाना करण्यात आले मात्र उपचार घेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. मकरंद याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. मकरंद याने लोणी येथे एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. कालही तापमान 36 ते 37 अंश सेल्सीयसपेक्षा अधिक होते. 

उन्हात बाहेर फिरणे, डोक्यावर व कानास रुमाल न बांधणे, उपाशीपोटी उन्हात फिरणे, अतिथंड पाणी पिणे इत्यादी कारणांमुळे उष्माघात होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.