Mon, Aug 19, 2019 01:23होमपेज › Ahamadnagar › चोर समजून मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

चोर समजून मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 12:40AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

शहरात जुनी मामलेदार कचेरी या ठिकाणी एका 45 वर्षाच्या अनोळखी इसमास चोर समजून दोघांनी केलेल्या बेदम मारहाणीत तो जबर जखमी झाला. बेवारस अवस्थेत साईबाबा चौफुली पेट्रोल पंपाजवळ सदर इसमाचे प्रेत सापडले. दरम्यान,  शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर व साक्षीदाराच्या महत्त्वपूर्ण साक्षीनंतर महिन्यानंतर दोघांवर कोपरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

1 जुलै 2018 रोजी जुनी मामलेदार कचेरी या ठिकाणी सदरचा अनोळखी इसम हा  रात्री 11 वाजेच्या सुमारास संशयितरित्या फिरत होता. त्यावेळी अफताफ अबुबकर मनियार (वय 21), व  शेख महंमद हुसेन शबीरभाई (वय 21, दोघे कोपरगाव) यांनी चोर समजून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याचेकडील मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार गाडीमध्ये बसवून त्याला साईबाबा कॉर्नर सोसायटी पेट्रोल पंपाजवळ रोडच्या बाजुला चहाचे टपरीजवळ सोडून त्याठिकाणाहून धूम ठोकली. 2 जुलै रोजी बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आला. अकस्मात मृत्यूची नोंद करुन शवविच्छेदन झाले. याबाबत इम्रान   शेखची साक्ष व शवविच्ेछदन अहवालावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.