Wed, Sep 26, 2018 11:11



होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या पुतळ्याचे दहन

राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या पुतळ्याचे दहन

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:51PM



पाथर्डी/ नेवासा ः  प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी वंजारी आरक्षण व ऊसतोडणी कामगारांच्या संपाविषयी लोकनेते गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेवर केलेल्या आरोपाचे पडसाद पाथर्डीत उमटून भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यानी जुन्या बस स्थानकाजवळील वसंतराव नाईक चौकात अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचा पुतळा जाळून रस्तारोको आंदोलन करत निषेधाच्या घोषणा दिल्या.

या आंदोलनामध्ये माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ.मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, पंचायत समितीचे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, येळीचे सरपंच संजय बडे, भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हा प्रभारी मुकुंद गर्जे, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगरसेवक रमेश गोरे, नामदेव लबडे, काशीताई गोल्हार, नगरसेविका मंगल कोकाटे, मनीषा घुले, माजी जि.प.सदस्य भगवान साठे आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलकांनी अ‍ॅड. ढाकणे विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. 

संजय बडे म्हणाले 1994 मध्ये औरंगाबाद येथील विश्रामगृहावर वंजारी आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीतील प्रतिज्ञापत्रावर माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांची सुद्धा सही आहे. या विरूद्ध मोठे षडयंत्र असून, मुंडे यांचे विरोधात बोलल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काही मिळेल अशी अपेक्षा ठेऊन अ‍ॅड.ढाकणे यांच्याकडून टीका सुरू आहे.  कालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पंकजांच्या नावावर मते घेऊन त्यांनी सभेला येऊ नये याकरीता घरी जाऊन त्यांचे पाय धरले.याचे उपकार विसरू नका. संघर्षासाठी रस्तावर आल्यास अगोदर आमच्याशी गाठ आहे 

सोमनाथ खेडकर म्हणाले मुंडेंच्या विरोधात बोलण्याची तुमची उंची नाही ग्रामपंचायत सदस्य म्हणून तरी निवडून येऊन दाखवा. आठवडे बाजारच्या दिवशी मुख्य चौकात आंदोलन झाल्याने रस्ताच्या दुतर्फा वाहनांची गर्दी झाली.

ढाकणे यांचा पुतळा जाळला

नेवासा: स्व. केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंढे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे विषयी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी अपशब्द वापरल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे वतीने भाजपा कार्यालयासमोर पुतळा जाळण्यात आला. 

सचिन सांगळे म्हणाले की, मुंढे साहेबांनी प्रताप ढाकणे यांना पक्षात मानाचे स्थान, सन्मानाची वागणूक दिली. त्याच नेत्यांनी आज पिता समान मुंढे साहेबांचा अपमान केला. युवा मोर्चाचे सरचिटणीस निरंजन डहाळे म्हणाले की, प्रताप ढाकणे यांचे बोलणे हे बारामतीहून आलेले वारे आहे.

यावेळी रामकिसन गर्जे, राजेंद्र कीर्तने, जनार्दन जाधव, देविदास साळुंके, रहेमान पिंजारी, राजेंद्र मुथ्था, अशोक टेकणे, शशिकांत मतकर यांनी घोषणा देऊन निषेध केला. यावेळी मुक्तार शेख, सचिन नागपुरे, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, भारत डोकडे, दत्तात्रय बर्डे, राजेंद्र मापारी, शिवाजी शिरसाठ, रोहित पवार, पोपट शेकडे, ज्ञानेश्वर टेकाळे, गोरे उपस्थित होते.