Tue, Jul 16, 2019 11:44होमपेज › Ahamadnagar › रविना टंडन हिच्या पुतळ्याचे केले दहन

रविना टंडन हिच्या पुतळ्याचे केले दहन

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:41PMनगर : प्रतिनिधी

शेतकरी आंदोलकांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भूमीपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्लीगेट येथे सिनेअभिनेत्री रविना टंडन हिच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. शेती माल व दूधाला योग्य हमीभावासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रविना टंडन हिने शेतकरी आंदोलन करताना शेतमालाची नासाडी व सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करुन जामीन न देण्याचे ट्विट केल्याने ती वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, निलेश तळेकर, अशोक आदळे, संतोष कोरडे, संतोष हांडे, रोहन आंधळे, सुनील मुळे, विकास भोर, गणेश गोळे, कैलास कोकाटे, वेदांत आंधळे, संजय भोर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.