Sun, Mar 24, 2019 23:29
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी लढाई सुरूच राहील : चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणासाठी लढाई सुरूच राहील : चंद्रकांत पाटील

Published On: Feb 03 2018 11:37AM | Last Updated: Feb 03 2018 11:29AMनगर : प्रतिनिधी

मराठा समाजातील तरुण वर्ग उद्योगाकडे वळावा, यासाठी सरकारने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान हाती घेतले आहे. व्यवसाय शिक्षणासह, व्यवसाय कर्जासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मराठा तरुण-तरुणींना याचा फायदा होणार आहे. तर, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आयोगाचा अहवाल आल्यावर त्यानुसार न्यायालयीन लढाई सुरूच राहील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नगर येथे पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या तीन वर्षात राज्यामध्ये ३८ हजार किमीचे रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील कामांच्या दर्जाबाबत दक्ष रहावे. मात्र, यात लोकप्रतिनिधींनी त्रास देवू नये, भाजपच्या लोकप्रतिनिधींसाठीही हीच सूचना आहे, असेही ना. पाटील यांनी सांगितले.