Wed, Apr 24, 2019 00:21होमपेज › Ahamadnagar › नगर-पुणे महामार्गावरील ढाब्यांवर सर्रास दारू विक्री

नगर-पुणे महामार्गावरील ढाब्यांवर सर्रास दारू विक्री

Published On: Jan 31 2018 11:48PM | Last Updated: Jan 31 2018 11:38PMसुपा : वार्ताहर

नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व ढाबे आहेत. त्यातील अनेक हॉटेलचालकांनी दारू विक्रीचे परवाने घेतले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील हॉटेलमध्ये दारू विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले. त्यामुळे या हॉटेलमधील दारू विक्री बंद झाली. त्यामुळे ढाब्यांवर सरर्रास चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 
नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी नारायणगव्हाण गावचा व इतर भागांतील दारू बंदीचा प्रस्ताव पोलिस खात्याकडे दिला होता.

त्यामुळे काही दिवस ढाब्यांवरील अवैध दारू विक्री बंद झाली होती. मात्र पुन्हा काही हॉटेल व ढाब्यांवर अवैध दारू विक्री सुरूच आहे. काही हॉटेल मालक शिरूर व नगरहून दारूचे बॉक्स आणून खुलेआमविक्री करत असल्याचे दिसत आहे. अधिकृत दारू विक्रीची हॉटेल बंद झाली असली, तरी अवैध मार्गाने खुलेआम दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या दारूमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. अवैध दारू विक्रीमुळे महामार्गावरचे हॉटेल व ढाबे मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात.या अवैध दारू विक्रीकडे प्रशानाचे दुर्लक्ष होत असल्याने महामार्गावर अनेक गुन्हेगार हॉटेलवर व ढाब्यांवर वावरत असतात. त्यातूनचनारायणगव्हाण, वाडेगव्हाण, बेलवंडी फाट्यासारखे हत्याकांड घडले आहेत. 

अगदी गावठी कट्ट्यांचा वापरही हे गुन्हेगार करत असल्याचे दिसून येते. दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्ट्यांचा गुन्हेगारांकडून वापर होत आहे. मात्र या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. 
सुपा औद्योगीक वसाहतीत निविदा मिळविण्यासाठी दहशतीचा वापर करणार्‍यागुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली असली, तरी गुन्हेगारी कमी झालीनाही. या गुन्हेगारीस अवैध दारू विक्री कारणीभूत असून, ती बंद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.