Fri, Aug 23, 2019 21:16होमपेज › Ahamadnagar › कळस येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन

कळस येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 11:53PMअकोले : प्रतिनिधी

तालुक्यातील कळस बुद्रुक येथे छावा वारियर्स संघटना व ग्रामस्थांच्या वतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल कडकडीत बंद पाळून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, काल अकोले आगारातून एकही एस.टी. बस बाहेर पडली नाही. याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला,

कळस ग्रामस्थांनी काल कडकडीत बंद पाळला. या आंदोलनात काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, भारत वाकचौरे, रामकृष्ण वाकचौरे, रमेश कानवडे, गोरख वाकचौरे, दत्तात्रय वाकचौरे, छावा संघटनेचे अध्यक्ष राहुल वाकचौरे, अतुल गोडसे, गुरुराज चव्हाण, सचिन वाकचौरे व आदि सहभागी झाले होते.  तसेच एस. टी. वाहतून पूर्णतः बंद होती. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला. आज महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती पंचवीस टक्क्यांपेक्षाही कमी होती.