Thu, Jul 18, 2019 21:10होमपेज › Ahamadnagar › अत्याचारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी 

अत्याचारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी 

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 12 2018 11:49PMकोपरगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कारवाडी येथील एका वीटभट्टीवर मजुरीचे काम करणार्‍या जोडप्याच्या सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शंकर पांडुरंग गायकवाड (रा. कारवाडी) यास दहा वर्षे सक्तमजुरी व 13 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. वाय. ए. के. शेख यांनी सुनावली. सहायक सरकारी वकील बी. डी. पानगव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, 7 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कारवाडी येथील बबन जगताप यांच्या वीटभट्टीवर काम करणार्‍या जोडप्याच्या सात वर्षांच्या मुलीस आरोपीने जवळील उसात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोपरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. काद्री यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी वकील यांनी सहा साक्षीदार तपासण्यात आले व त्याच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने  लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 अन्वये दोषी धरण्यात आले.

आरोपी गायकवाड यास पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास, दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार दंड, तो न भरल्यास एक वर्षे कारावास लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार दंड तो न भरल्यास एक वर्षे कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे पानगव्हाणे यांनी म्हटले आहे.

Tags : Ahmadnagar, Ten, years, jail, because, Atrocity