Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Ahamadnagar › मंदिर, मस्जिद माणुसकीची केंद्रे : हभप रंधवे

मंदिर, मस्जिद माणुसकीची केंद्रे : हभप रंधवे

Published On: Sep 11 2018 1:35AM | Last Updated: Sep 11 2018 12:05AMनान्नज : वार्ताहर 

मंदिर, मस्जिद ही तर माणुसकीची केंद्रे असून, यामधून माणुसकीची माणसे घडविली जातात. जाती या तर माणसाने निर्माण केल्या आहेत. त्या ईश्वराने तयार केल्या नसल्याचे प्रतिपादन हभप रामकृष्ण रंधवे महाराज यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आयोजित केलेल्या समारंभाप्रसंगी केले. 

हभप रामकृष्ण रंधवे महाराज यांनी 31 वर्षात केलेल्या साडे पंधरा हजार कीर्तनाची व त्यांनी केलेल्या निःस्वार्थ सेवेची गिनीज बुकात नुकतीच नोंद घेण्यात आली. रंधवे महाराज यांचा नान्नज पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलत होते. 

यावेळी सरपंच डॉ. सर्जेराव मोहळकर, हभप राजेंद्र किंबहुने महाराज, हभप नारायण काटे महाराज, शिवसेनेचे जामखेड तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहळकर, नंदादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख मोहळकर, जवळके (सटवाई) युवा नेते संतोष वाळुंजकर,  ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर किंबहुने, माजी ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक पवार, वारकरी सोपान मोहळकर, शंकर मोहळकर, दशरथ मोहळकर, बापू मोहळकर, नवनाथ मोहळकर, देवरे दाजी, वसंत कोळपकर याच्यांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. सर्जेराव मोहळकर होते. प्रास्ताविक हभप राजेंद्र किंबहुने महाराज यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार लियाकत शेख तर आभार बबन मोहळकर यांनी मानले.