Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Ahamadnagar › मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 12:50AMसंगमनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेने शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली.

संगमनेर तालुक्यातील एका शाळेवरील मुख्याध्यापक हा गेल्या दोन वर्षांपासून एका शिक्षिकेला त्रास देत होता. तसेच काही सहकार्‍यांना सदर महिला शिक्षिकेच्या पतीचा मोबाईल क्रमांक देऊन त्या शिक्षिकेची बदनामी करण्यास सांगितले. यातील बहुतेकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.   पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एकजण  वेगवेगळ्या नंबरवरून त्या शिक्षिकेच्या पतीला फोन करीत होता. त्यावरून त्यावरून संबंधित शिक्षिका व तिच्या पतीमध्ये भांडणे सुरू होती.

या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी या दाम्पत्याने शहर पोलिस ठाणे गाठले व संबंधित मोबाईल नंबर पोलिसांना दिला. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. फोन करणार्‍या त्या व्यकिचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी संगमनेरला आणले.   पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सगळा सत्यप्रकार कथन करीत ‘त्या’ मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याची कबुली दिली व माफीनामा लिहून दिला. या संपूर्ण षडयंत्रामागे आपल्या शाळेतील मुख्याध्यापक असल्याचे समोर येताच त्या शिक्षिकेने गेल्या दोन वर्षांपासून तो मुख्याध्यापक आपली छेडधाड काढत असल्याचे पोलिसांना सांगितले.अखेर बुधवारी रात्री पोलिसांनी याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच हा गुरुजी शहरातून पसार झाला आहे.

या प्रकरणाचा अहवाल झेडपीकडे पाठवला

सदरच्या शिक्षिकेचा तक्रार अर्ज आमच्या वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे. त्या  शाळेतील अन्य महिला शिक्षिकांकडूनही माहिती संकलित केली असून याचा सविस्तर अहवाल 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेला पाठविला आहे. वरीष्ठांकडून आदेश आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.  -साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी संगमनेर पंचायत समिती