होमपेज › Ahamadnagar › जलप्रदूषण टाळण्यासाठी पुढाकार घ्या : महाजन

जलप्रदूषण टाळण्यासाठी पुढाकार घ्या : महाजन

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 12:55AMनगर : प्रतिनिधी

जलसंवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. पाण्याचा ताळेबंद आवश्यक असून, जिल्हाभरातील जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  अभय महाजन  यांनी केले.

राज्यभरात 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्‍ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार नियोजन भवनात काल (दि.16) जलजागृती सप्‍ताहाचे उदघाटन जिल्हाधिकारी महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील,  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. सुनिल गोरंटीवार, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता होशिंग आदींची विशेष उपस्थिती होती.  

पाण्याचा ताळेबंद गरजेचा असून, पाण्याची उपलब्धता व त्याप्रमाणे वापर केला तर जलसमद्धी नक्‍की येईल. जलयुक्‍त शिवारामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून, प्रत्येकाच्या सहभागामुळेच हे यश मिळाल्याचे जिल्हाधिकारी महाजन यांनी आवर्जून सांगितले. जलजागृती सप्‍ताहनिमित्त  लाभक्षेत्रातील  प्रत्येक गावात, तालुका व जिल्हयाचे ठिकाणी सभा, बैठका, मेळावे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता अहिरराव यांनी सांगितले.

प्रारंभी कुकडी, प्रवरा, मुळा, गोदावरी, सीना, आढळा आणि घोडनदी आदी नद्यांचे जलकलश पूजन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जलप्रेमी सुखदेव फुलारी व प्रा.गोरंटीवार यांनी सिंचन शेतीबाबतचे  महत्त्व सांगितले. वेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags : Ahmednagar, Ahmednagar News, water pollution,