Mon, May 20, 2019 11:00होमपेज › Ahamadnagar › मराठी माध्यमातूनच शिक्षण घ्या : वर्षा उसगावंकर

मराठी माध्यमातूनच शिक्षण घ्या : वर्षा उसगावंकर

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:08PMकोरडगांव : वार्ताहर

मराठी माध्यमाचे शिक्षण घेतल्याने आपण स्पर्धेत कोठे कमी पडू हा गैरसमज आहे. मी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेऊनच माझे व्यक्‍तिमत्व फुलवले आहे. तुम्ही मराठी माध्यमातच शिक्षण घ्या, असा सल्ला अभिनेत्री वर्षा उसगावंकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

पाथर्डी तालुक्यातील कोरडगांव येथे राजे छत्रपती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित होत्या. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा शिक्षणाधिकारी लक्ष्मण कोल्हे, नगराध्यक्ष डॉ.मृत्यूंजय गर्जे, नगरसेवक रमेश गोरे, शिवाजी बनसोडे, सरपंच विष्णू देशमुख, चेअरमन नारायण काकडे, अशोक गोरे, अशोक कांजवणे यावेळी उपस्थित होते. 

आ. विनायक मेटे म्हणाले की शिवछत्रपती स्मारकाचे काम तातडीने सुरू करून ते पूर्ण केले जाईल. त्यामुळे महाराजांचा आदर्श समाजात द‍ृढ होण्यास मदत होईल. शिक्षणाची गुरुकुल परंपरा ही पूर्वीपासून प्रचलित आहे. परंतु राजकारण्यांनी शिक्षण क्षेत्राचे व्यावसायिकरण केले आहे. त्यामुळे शैक्षणिक खर्च गोरगरिब जनतेला पेलण्यासारखा राहिला नाही. त्यामुळे बहुजन समाजाने राजकारणापासून दूर रहावे. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवाजी बनसोडे यांनी तर आभार अशोक बनसोडे यांनी मांडले.