Thu, Apr 25, 2019 15:49होमपेज › Ahamadnagar › स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्तारोको

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्तारोको

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 23 2018 10:29PMमढी : वार्ताहर 

बोंडअळीमुळे  नुकसान झाल्याने कापूस उत्पादकांना प्रत्यक्ष पाहणी अहवालानुसार साडेसदोतीस हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावे. पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील आपदग्रस्त शेतकर्‍यांचा नुकसान भरपाईसाठी समावेश करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर प्रांताधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनी केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे, शेवगाव तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहराध्यक्ष दत्ताभाऊ फुंदे, गोरक्ष ढवळे, युवा आघाडी पाथर्डी तालुका कृष्णा उदार, सोनू कचरे, डॉ. आर भगत, विवेकराव मोरे, शुभम वाबळे, हरिओम ढमाळ, प्रदीपराव दुसंग उपस्थित होते.

सुनील लोंढे म्हणाले, जिल्ह्यात पाथर्डी व शेवगाव तालुके कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. या दोन्ही तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नुकसान भरपाईसाठी झालेला नाही. पाथर्डी तालुक्यातील 47 हजार 192 शेतकर्‍यांच्या 36 हजार 131 हेक्टर शेवगाव तालुक्यातील 57 हजार 505 शेतकर्‍यांचे 47 हजार 193 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान झाले. याबाबतचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे मात्र, त्यातून दोन्ही तालुक्यांना वगळण्यात आल्याने हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत..

बोंडअळीच्या नुकसानामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शासनाकडून दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. आतापर्यंत शासनाच्या एकही निर्णयाची अंमलबजावणी नाही. निर्णयाची अंमलबजावणी कर्मचार्‍यांकड्डन होत नसल्याने शेतकरी आत्महत्यांना जवळ करीत आहे. अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडले तरी निम्मी कामे मार्गी लागणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा सर्व पातळ्यांवर शासनाचे निषेध करून आंदोलन हाती घेतले जाईल. तहसीलदार नामदेव पाटील यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे मागण्या पाठविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.