होमपेज › Ahamadnagar › पथदिवे घोटाळा : नगरचे प्रभारी उपायुक्त निलंबित

पथदिवे घोटाळा : नगरचे प्रभारी उपायुक्त निलंबित

Published On: Feb 23 2018 2:37PM | Last Updated: Feb 23 2018 3:23PMनगर : प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात गाजत असलेल्या महापालिकेतील पथदिवे घोटाळा प्रकरणी सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे यांना नगरविकास विभागाने निलंबित केले आहे. सचिव मनीषा म्हैसकर यांच्या मान्यतेने सहसचिव एस. एस. गोखले यांनी दराडे यांच्या निलंबनाचे आदेश बजावले आहेत. मनपा स्तरीय चौकशीत उपायुक्त दराडे यांच्यावर गंभीर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

वाचा : जिल्ह्यामध्ये पकडली सव्वा कोटीची वीजचोरी

दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे अधिकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.