Mon, Aug 19, 2019 13:20होमपेज › Ahamadnagar › जोशीवस्ती दंगलप्रकरणी सात अटकेत

जोशीवस्ती दंगलप्रकरणी सात अटकेत

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 10:41PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना येथील जोशी वस्तीवर जातपंचायत चालू असताना मोबाईलवर चित्रीकरण केल्यावरुन झालेल्या दंगलीप्रकरणी परस्परांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींची संख्या तब्बल 66 आहे.श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई माळावर जात पंचायत चालू असताना एका युवकाने आपल्या मोबाईलवर व्हिडीओ चित्रिकरण केले. त्यावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाली. जखमींवर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बायडाबाई भीमा फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आमच्या नातेवाईकांसमवेत बैठक सुरु असताना अनिल गायकवाड हा त्याचे चित्रिकरण करीत होता. आमच्या बैठकीचे चित्रिकरण करू नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने  आरोपी सुरेश भीमा पालवे, चंद्रा भीमा पालवे, भीमा हनुमंत पालवे, अण्णा बाबू गायकवाड, गंगा बाबू गायकवाड, गंगा हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगा पालवे, अनिल गंगा पालवे, माणिक उत्तम गायकवाड, कान्हू बाबू गायकवाड, राजेश बाजीराव गायकवाड, रामा बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव फुलमाळी, गुलाब सटवा गायकवाड, रामा सटवा गायकवाड, सुनील रामा गायकवाड, बापू गोविंदा गायकवाड, अनिल रामा गायकवाड, भानुदास बापू गायकवाड, सुरेश भीमा गायकवाड, भीमा सटवा गायकवाड,सुरेश उत्तम गायकवाड, रावसाहेब रामा गायकवाड, दगडू रामा गायकवाड, मालन भीमा पालवे, रंगू गंगा पालवे, आक्काबाई रामा गायकवाड, शांताबाई उत्तम गायकवाड, अलकाबाई बापू गायकवाड, मंगल बापू गायकवाड, भामाबाई कान्हू गायकवाड, नरसाबाई बाजीराव फुलमाळी, शांताबाई भीमा गायकवाड, बायडबाई बाजीराव गायकवाड, सर्जेराव बाजीराव गायकवाड, ताराबाई बाबू गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती, श्रीगोंदा कारखाना) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवत मारहाण केली. त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदा जमाव जमविणे, दंगल, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रंगू गंगाराम पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या घरासमोर जात पंचायत बसली होती. नेमके काय चालले हे पाहण्यासाठी अनिल पालवे गेला असता जमावाने दगडफेक करत मारहाण करण्यास सुरुवात केली.  आरोपी रामा रायबा फुलमाळी, तात्या शिवराम, गायकवाड, सायबा रंगनाथ उमरे, रावसाहेब तात्या गायकवाड, उत्तम रंगनाथ उमरे, शिवराम गंगाराम दिंगरे, अण्णा अश्रू फुलमाळी, भीमा गोपाळ गायकवाड, रामा बाबुराव काकडे, शेटीबा रामा काकडे, सुभाष हनुमंत फुलमाळी, गंगा व्यंकट मले, सुभाष गंगा मले, रामदास गंगा मले, गोविंद बापू मले, सर्जेराव गोविंद मले, राजेश गोविंद पालवे, शालनबाई गोविंद पालवे, रामा बाबू काकडे, साहेबराव महादू काकडे, अनिल साहेबराव काकडे, सुनिल साहेबराव काकडे, नेबर व्यंकट फुलमाळी, साहेबराव गुलाब काकडे, उत्तम बाबू ककडे, विनायक नेबर फुलमाळी, कान्हा बापू काकडे, भीमा सटवा गायकवाड, व्यंका बाबू काकडे, बाबासाहेब कान्हू काकडे (रा. जोशीवस्ती, ढोकराई, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल घडविणे, तसेच आर्म अ‍ॅक्ट 4 व 25, बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 7 व 8, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

ढोकराई परिसरात दोन गटांत तुफान दंगल झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. श्रीगोंदा पोलिसानी घटनास्थळी जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये 73 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांची चौकशी करून सोडून देण्यात आले.