Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › 'भांडवलदारांना पैसे बुडवण्याची मुभा सरकारकडूनच!'

'भांडवलदारांना पैसे बुडवण्याची मुभा सरकारकडून'

Published On: Feb 16 2018 11:04AM | Last Updated: Feb 16 2018 11:13AMनगर : पुढारी ऑनलाईन 

देशात झालेला सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणून पंजाब नॅशनल बँकेकडे पाहिले जात आहे. हा घोटाळा मोदी सरकारच्या काळातला आहे. यामुळे विरोधक यावरून सरकारला धारेवर धरत आहेत. आज शिर्डी येथे झालेल्या ‘हल्लाबोल’ मोर्चात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनीही ही संधी सोडली नाही. ‘मोठ्या भांडवलदारांना बँकांचे पैसे बुडवून पळून जाण्याची  मुभा देण्यात आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही’ अशा शब्दात त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. 

‘वरिष्ठ पातळीचा आशीर्वाद असल्यामुळेच हा महाघोटाळा झाला. कर्जमाफी होत नाही, राज्याचा कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढली जातेय, पण बड्या भांडवलदारांना वाचवले जातेय,’ असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तिसरा टप्पा सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. 

नगर जिल्ह्यात काल दिवसभर राष्ट्रवादीच्या तीन सभा झाल्या. या सभांबरोबरच राज्यभरात अनेक दौरे झाले. या दौऱ्यादरम्यान तरुणांच्या मनातला रोष बघायला मिळत आहे. राज्यात महिला असुरक्षित आहेत त्यामुळे त्यांच्या मनातही खदखद दिसून येत आहे. लोकांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा राज्याच्या सत्तेवर परिणाम होणार, असेही तटकरे म्हणाले.