Thu, Sep 20, 2018 20:34होमपेज › Ahamadnagar › एसपी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

एसपी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 12:07AMनगर : प्रतिनिधी

घरी पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून काल (बुधवार) सकाळी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वर्षा अमोल सोनवणे (वय 27) असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी या महिलेविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या महिलेला तिचा पती सतत त्रास देत आहे. या त्रासामुळे काल बुधवारी (दि. 31) सकाळी 9 वाजता वर्षा हिने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात येऊन विषारी रोगर औषध सेवन केले. यावेळी पोलिसांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी वर्षा सोनवणे हिच्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.