होमपेज › Ahamadnagar › व्याापारी, नागरिकांच्या जीवाशी खेळ! 

व्याापारी, नागरिकांच्या जीवाशी खेळ! 

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMसावेडी : प्रतिनिधी 

शहरातील  कापड बाजार, सराफ बाजार, आडते बाजार, भिंगारवाला चौक, घासगल्ली, आडते बाजार, मोची गल्ली, येथे विद्युत रोहित्र रस्त्यावरच असल्याने, व्यापारी, तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. या ठिकाणी अचानक शॉटसर्किट होऊन, रोहित्र जळण्याचे घटना होत आहेत.  त्यामुळे  व्यापार्‍यांनी महावितरणकडे वारंवार  तक्रार करुनही महावितरण अधिकारी जाणिवपूर्वंक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्ली,  सराफ बाजार, आडते बाजार, परिसरात अनेक वस्त्रदालने, प्‍लॅस्टीक साहित्य, ताडपत्री, इलेट्रॉनिक उपकरणे, फुट वेअर, खाद्य पदार्थ, महिला प्रसाधने, सोने- चांदी आदी व्यवसायिकांची दुकाने आहेत. सणासुदीच्या दिवसात महिलासह नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, या ठिकाणी रस्त्यावरच रोहित्र असून  विजेच्या खांबावरील तारा अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत. या रोहित्रावर अधिक भार पडल्यास  अचानक रोहित्र, तर कधी खांबावरुन ठिणग्या पडतात. तसेच काही दुकानातील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बाजारपेठेत व्यापार्‍यासह ग्राहकांना जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. 

महावितरण ऐण सणासुदीच्या काळात तसेच पावसाळ्यात सायंकाळी वारंवार वीजपुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे बाजारात आलेल्या महिलांचे पर्स, गळ्यातील गंठण, पाकीट, सराफी दुकानातील सोने - चांदीची दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहे. व्यापार्‍यासह ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सराफ बाजारात  रोहित्राची संख्या वाढविण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे.  मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने खांबावरील तारांचे घर्षन होऊन बाजारात कायम वीज खंडीत होणे,  खांबावर जाळ होणे, तसेच खांबावरुन पडलेल्या ठिणग्यामुळे रस्त्यावरील फेरीवाले तसेच अत्यावश्यक साहित्यांना आग लागणे,  चोरी होणे, अशा घटना घडतात. रस्त्यात रोहित्र असल्याने वाहतुक कोंडी ही नित्याचीच  बाब झाली आहे.  उन्हाळ्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे.  त्यामुळे महावितरण बाबत नागरिकांच्या संतप्त आहेत.

महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी खांबावरील तारा सुरक्षित करण्याची गरज आहे. तसेच अनेक भागात असणार्‍या खांबावर पथदिवे नाहित. त्यामुळे  परिसरात आंधाराचे साम्राज्य असते. त्याचाच फायदा चोर उचलतात. त्यासाठी बाजारपेठेतील खांबावरील महापालिकेने त्वरीत पथदिवे बसवावेत. अशी व्यापार्‍यांची मागणी आहे.