Tue, Jan 22, 2019 09:40होमपेज › Ahamadnagar › पथदिवे घोटाळा प्रकरणी दराडे आणि झिरपेंना अटक   

पथदिवे घोटाळा प्रकरणी दराडे आणि झिरपेंना अटक   

Published On: Mar 08 2018 2:52PM | Last Updated: Mar 08 2018 2:50PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यात महापालिकेचे उपायुक्त विक्रम दराडे व कॅफो दिलीप झिरपे या दोघांना तोफखाना पोलिसांनी आज दुपारी अटक केली. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी ही कारवाई केली.  

तर आरोपी रोहिदास सातपुते याच्या पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील घरावर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने छापा टाकला. सातपुते यांच्या घराची व फार्महाऊसची झडती घेण्याचे काम सुरू आहे.