Sun, Apr 21, 2019 02:45होमपेज › Ahamadnagar › रोहिदास सातपुतेचा जामीन अर्ज फेटाळला

रोहिदास सातपुतेचा जामीन अर्ज फेटाळला

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 06 2018 11:04PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील आरोपी रोहिदास सातपुते याचा जामीन अर्ज न्यायालयाने मुख्य न्यायदंडधिकार्‍यांनी काल (दि. 6) फेटाळून लावला. गुन्ह्याचा तपास चालू असल्याने जामीन देता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.

सातपुते हा पथदिवे हा घोटाळ्याचा सूत्रधार असून, तो गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे साडेतीन महिने फरार होता. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याने घोटाळ्यातील मूळ फायली गायब केल्याचा संशय आहे. फायली गायब करण्यासाठी वापरलेली फोर्ड फिगो कार पोलिसांनी जप्त केली आहे. सातपुते याने जामिनासाठी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे अर्ज केला होता. मंगळवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. बुधवारी त्यावर निर्णय होणार होता. 

पथदिवे घोटाळ्याचा तपास अजून सुरू आहे. त्यामुळे रोहिदास सातपुते याला जामीन देणे योग्य राहणार नाही, असे मत नोंदवून न्यायालयाने सातपुते याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.