Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Ahamadnagar › नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव(video)

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

Published On: Feb 16 2018 2:03PM | Last Updated: Feb 16 2018 2:12PMनगर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयावर आज संतप्त जमावाने दगडफेक केली. या वेळी शिवसेनेसह शिवप्रेमी संघटनांकडून उपमहापौरांचा निषेध करण्यात आला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. या प्रकारानंतर शिवसेनेने छिंदम यांच्या अटकेची व राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातमी : नगर : शिवजयंतीबद्दल उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मनपा कर्मचार्‍याची खरडपट्टी काढताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, कर्मचार्‍याने युनियनकडेही याबाबत तक्रार केली होती. या प्रकाराची गंभीर दखल शिवप्रेमींनी घेतली आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज  आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या विरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली असून, शिवसेना कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.