Sat, Sep 22, 2018 20:49होमपेज › Ahamadnagar › कॉपीमुक्‍त परीक्षेसाठी राज्यव्यापी अभियान

कॉपीमुक्‍त परीक्षेसाठी राज्यव्यापी अभियान

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Mar 01 2018 12:15AMनगर : प्रतिनिधी

कॉपीमुक्‍त परीक्षेसाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद सोनवणे यांनी राज्यव्यापी अभियान राबविले. या अभियानाला प्रत्येक जिल्ह्यातून, शाळांमधून उदंड प्रतिसादही मिळत आहे. 

कॉपीमुक्‍त परीक्षेसाठी त्यांनी राज्यातील सर्वच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना पत्र पाठविलेले आहे. परीक्षेला मिळालेले अनन्यसाधारण महत्त्व, परीक्षेत होणारे गैरप्रकार, यामुळे गुणवत्तेची व होतकरू विद्यार्थ्यांची होणारी हानी, याबाबत उपाययोजना सुचविल्या आहेत.

त्यामध्ये विद्यार्थ्यांना संबंधित अधिनियम, शिक्षा, दंड याविषयी माहिती करून देणे, भरारी पथक नेमणे, स्थिर पथकांची नेमणूक करणे, परीक्षा केंद्रावर इतरांचा वावर नसणे, केंद्रप्रमुख म्हणून दुसर्‍या विद्यालयातील पदाधिकार्‍यांची नेमणूक करणे, अशा उपाययोजनांची मागणी त्यांनी केलेली आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीच्या प्रश्‍नावर सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.