Fri, Apr 19, 2019 12:12होमपेज › Ahamadnagar › लाटेवर निवडून आल्यानंतर दमछाक होणारच : आशुतोष काळे

लाटेवर निवडून आल्यानंतर दमछाक होणारच : आशुतोष काळे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोळपेवाडी : वार्ताहर

माजी आ. अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतानाही कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल व कोपरगाव शहरातील शासकीय इमारती त्या विकास कामांची आजही  साक्ष देत आहेत. माजी आ. अशोकराव काळे यांनी केलेल्या विकासकामांची बरोबरी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या अल्पशा कामांबरोबर कधीही होऊ शकणार नाही. विरोधी पक्षाचे आमदार असूनही अशोकदादांची निधी आणताना कधीही दमछाक झाली नाही. परंतु गल्लीपासून दिल्ली पर्यंत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या पक्षाचे सरकार असूनही केवळ लाटेवर निवडून आल्यानंतर निधी आणताना दमछाक होणारच, असा टोला कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांना लगावला आहे. कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या 14 व्या  वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामांचा प्रारंभ  आशुतोष काळे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अध्यस्थानी काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कदम होते. यावेळी जि.प. सदस्य सुधाकर दंडवते यांनी  आशुतोष काळे व जि.प. सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येणे ही काळाची गरज होती. तालुक्याच्या जनतेच्या दृष्टिने ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले. हा धागा पकडत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव आशुतोष काळे यांच्यासोबतच असल्याचे सांगितले.

याप्रसंगी जि.प. सदस्य परजणे, सुधाकर दंडवते, सोनाली रोहमारे, कारभारी आगवन, पं. स. सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Kopargaon, Rawande  gram Panchayat, development work,


  •