Wed, Nov 21, 2018 21:59होमपेज › Ahamadnagar › दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच!

दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच!

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 11:02PMनगर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रितपणे लढणार आहेत. नगरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. दोन वेळा पराभवाला समोरे जावे लागले असले, तरी त्या पराभवाची कारणे वेगळी होती. मतांचे विभाजन झाले होते. येत्या निवडणुकीत आघाडीमध्ये मतदारसंघाचा निर्णय वरीष्ठ नेते घेतील. मात्र, सध्या तरी नगर दक्षिणची जागा ही ‘राष्ट्रवादी’कडेच असल्याचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले.

नगर दक्षिण मतदारसंघातून सुजय विखे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे जागेची अदलाबदल होणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दक्षिणेची जागा ‘राष्ट्रवादी’कडेच असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार नरेंद्र घुले, प्रताप ढाकणे, दादाभाऊ कळमकर यांची नावे पुढे आली आहेत. मात्र अजून प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. असेही त्यांनी सांगितले. नेवासा मतदारसंघ उत्तरेत असला तरी मात्र माजी खासदार यशवंतराव गडाख हे ‘आघाडी’कडेच राहतील व ते आघाडीचे काम करतील, असे सांगत गडाखांच्या संभाव्य उमेदवारीचे संकेतही काकडे यांनी यावेळी दिले.