Sat, Jul 20, 2019 09:11होमपेज › Ahamadnagar › ‘शनैश्‍वर’साठी सौरऊर्जा प्रकल्प : बावनकुळे

‘शनैश्‍वर’साठी सौरऊर्जा प्रकल्प : बावनकुळे

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:43PMशनिशिंगणापूरः वार्ताहर

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे येणार्‍या भक्तांच्या सुविधांसाठी व वाढती गर्दी लक्षात विजेला पर्याय म्हणून 3 कोटी रुपये खर्चाच्या ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देऊ, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

शनिवारी(दि.28)  ना.बावनकुळे संपूर्ण परिवारासह शनिदर्शसाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत वरिष्ठ ऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

गेल्या 26 वर्षांपासून लग्नाचा वाढदिवस ते शिर्डी-शिंगणापूर येथे येऊन शनी मस्तक होऊन साजरा करतात. काल शनिशिंगणापुरात येऊन त्यांनी दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर या भव्य प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली. यामध्ये 50% रक्कम महाऊर्जा व 50% रक्कम शनैश्‍वर देवस्थान यांचा प्रस्ताव गृहीत धरून देशातील नामवंत संस्थेला काम देणार आहे. याकरीता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. सदर प्रकल्प 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असा मानस व्यक्त करून लवकरच याचे सर्वेक्षण व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील. या सौर ऊर्जा प्रकल्पमुळे विजेची बचत होणार असून, त्यात देवस्थानच्या उत्पन्नात आर्थिक फायदा होणार असल्याचे  ना. बावनकुळे यांनी लक्षात आणून दिले. 

यावेळी अ‍ॅड. सयाराम बानकर यांनी पांढरीपूल ते शिंगणापूर 132 के.व्ही.क्षमतेचा विजेचा प्रश्‍न आपल्या या अगोदरच्या भेटीत मार्गी लागल्याचे सांगितले.यावेळी देवस्थानच्या वतीने ना.बावनकुळे यांचा सत्कार कोषाध्यक्ष योगेश बानकर,विश्‍वस्त दीपक दरंदले, रावसाहेब बानकर, आप्पासाहेब शेटे यांनी केला.