Sat, Nov 17, 2018 15:16होमपेज › Ahamadnagar › बाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात

बाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात

Published On: Jun 09 2018 9:29PM | Last Updated: Jun 09 2018 9:29PMअहमदनगर : पुढारी ऑनलाईन

गावरान भाषा आणि राजकीय पुढाऱ्याचा रुबाब यामुळे लहान वयातच फेमस झालेल्या अहमदनगरचा बाल पुढारी  घन:श्याम दरोडेने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. या परिक्षेत त्याला ५१ टक्के गुण मिळाले. 

आपल्या या यशानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, माझ्या सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि आई-वडिलांच्या आशिर्वादामुळे हे यश मिळाले. दहावीत हे यश मिळवताना आलेल्या अडचणींवरुन त्याने सरकारवर टीका केली आहे. तो म्हणाला की,  गावात लाईट नियमित नाही. आली तर आली नाहीतर नाही अशी अवस्था. एसटी बस नसल्याने चालत प्रवास करावा लागला. रस्ते चांगले नाहीत. दळणवळणाची सुविधा नाही त्याची सोय लवकर करावी अशी मागणीही त्याने केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील एका लहानशा गावात जन्मलेला घनश्यामला जन्मताच असाध्य आजाराने ग्रासले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषण दिल्यानंतर तो प्रसिद्धिच्या झोतात आला होता. तो राजकारण्यांसारखा बोलत असला तरी तो राजकारणावर नाही तर लोकांच्या प्रश्नावर बोलतो. घनश्यामवर ‘मी येतोय’ नावाचा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. त्यात घनश्यामने स्वत: भूमिका केली आहे.