Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Ahamadnagar › नगरपंचायतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला

नगरपंचायतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला

Published On: Apr 10 2018 1:17AM | Last Updated: Apr 10 2018 12:44AMनेवासा: प्रतिनिधी 

नेवासा शहरातील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळील गाळ्यांवरील समोरील गॅलरी अचानक  पडली. सोमवारी नेवासा बंद असल्यामुळे नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नेवासा बंदमुळे अनेकांचे प्राण वाचले. 

नेवासा शहरात मुख्य चौकात पूर्वीचे ग्रामपंचायत कार्यालयात व आता नगरपंचायत कार्यालय आहे. या कार्यालयाखालील बाजूला समोरच्या दिशेने  सुमारे 20 ते 25 वर्षापूर्वी व्यापारी गाळे बांधण्यात आले होते. या संकुलामध्ये कापड, सराफ आदी दुकाने आहेत. या दुकानांसमोर पाणीपुरी, फुल विक्रेते अशी हातगाड्यांवरील दुकाने लागतात. या गॅलरीखाली उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक सावलीचा आसरा घेण्यासाठी थांबतात. अशा गजबजलेल्या ठिकाणच्या गॅलरीचा स्लॅब सोमवारी दुपारी अचानक कोसळला. परंतु सोमवारी नेवासा शहर बंद असल्याने  दुकानदारांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी मात्र झाली नाही.  

नगरमध्ये शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्याकांडामुळे शिवसेनेने रविवारी जिल्हा बंदच हाक दिली होती. परंतु, रविवारी नेवाशाचा आठवडे बाजार असल्यामुळे सोमवारी नेवासा बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. शहरात कडकडीत बंद होता. घटनास्थळ नेहमीच गजबजलेले असते. मात्र, बंदमुळे तेथे  शुकशुकाट होता. गाळ्यासमोरील बांधकामाचे  नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळली हेच महत्त्वाचे. घटनास्थळी मात्र बघ्यांची गर्दी झाली होती.  काही वर्षांपूर्वीच हे बांधकाम झाले होते. निकृष्ठ दर्जामुळेच ते पडले असे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

Tags : Nevasa, Nevasa news, Nevasa Nagar Panchayat, gallery collapsed,