Fri, Feb 22, 2019 15:36होमपेज › Ahamadnagar › श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय राज्यात प्रथम

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय राज्यात प्रथम

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 12:47AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयास राज्य सरकारकडून कायाकल्प योजनेंतर्गत राज्यातील प्रथम क्रमांकाचे 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांनी पुरस्काराची घोषणा केली आहे.

स्वच्छ भारत अभियानातील पूर्वीच्या कायापालट या प्रकल्पाचे आता कायाकल्प असे नामकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत येणारे जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय  या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करतात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील श्रेणीमध्ये श्रीरामपूरने बाजी मारली. जिल्हा व राज्य पातळीवरील आरोग्य पथकाने वर्षभरात 3 वेळा रुग्णालयाची पाहणी करून मूल्यांकन केले. त्यानंतर पुरस्काराची घोषणा झाली. राज्य स्तरावरील पथकाने केलेल्या पाहणीत  श्रीरामपूर रुग्णालयास 99 टक्के गुण मिळाले.  

ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता, टापटीप, अद्ययावत आरोग्य सुविधा व सेवा देणारे कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका याचेही महत्त्वाचे योगदान असल्याने या रुग्णालयाचा दिवसेंदिवस नावलौकिक वाढत चालला आहे.  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वसंतराव जमधडे, तसेच कर्मचार्‍यांचाही श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहनराव शिंदे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.