Tue, Jul 23, 2019 17:24होमपेज › Ahamadnagar › पुन्हा अनुभवले कॉलेज जीवनातील क्षण

पुन्हा अनुभवले कॉलेज जीवनातील क्षण

Published On: Jan 01 2018 1:52AM | Last Updated: Dec 31 2017 10:29PM

बुकमार्क करा
श्रीरामपूर : प्रतिनिधी

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात पाच ते पंचवीस वर्षा दरम्यान शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींना माजी विद्यार्थिनींच्या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॉलेज जीवनातील ते रमणीय क्षण अनुभवण्याचा प्रत्यय आला.  जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या  या कार्यकमासाठी मंत्रालयातील सेक्रेटरी यमुना कारले, ठाणे येथील सहकार खात्यातील अधिकारी वैशाली पठारे, मुंबई येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी लता शिरसाठ, इन्फोसेसच्या प्रोजेक्ट मॅनेजर राणी कडू, लोणी खुर्दच्या सरपंच मनिषा आहेर, अविष्कार बायोफार्मच्या संचालिका ज्योती घोगरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, सहसचिव भारत घोगरे उपस्थित होते. 

प्रारंभी डॉ. प्रतिभा कानवडे यांनी परिचय तर प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयात सेक्रेटरी असलेल्या यमुना कारले, पुणे येथील राणी कडू वरिष्ठ पोलिस अधिकारी लता शिरसाठ, वनिता विहीर, सुनीता कासार, स्मिता साबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. ज्योती घोगरे, वैशाली पठारे, मयुरी विखे, तेजाळ गाडे, प्रतिभा पाटील, सुरभी भालेराव, कल्पना विखे यांनीही पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामधेच  आम्ही समृद्ध झाल्याचे सांगितले.