Thu, Nov 15, 2018 03:48होमपेज › Ahamadnagar › माजी आ. जयंतराव ससाणेंचे निधन

माजी आ. जयंतराव ससाणेंचे निधन

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 12:24AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष माजी आ. जयंतराव मुरलीधर ससाणे (60) यांचे सोमवारी पहाटे श्रीरामपूर येथे त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. जिल्हा काँगे्रसचे ते विद्यमान अध्यक्ष होते. ससाणे हे श्रीरामपूरचे 10 वर्षे आमदार आणि 10 वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनामुळे श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील टाकळीभान, बेलापूर या गावांत बंद पाळण्यात आला. 

ससाणे गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होते. या काळात अनेकांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  तीन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, विरोधी  पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. सोमवारी पहाटे त्यांची प्रकृती एकदम खालवली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

ससाणे यांनी आमदार व नगराध्यक्षपदासह साईबाबा संस्थानचे अध्यक्ष, मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक, श्रीरामपूर पिपल्स बँकेचे संचालक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, हिंद सेवा मंडळाचे संचालक, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अशी अनेक पदे भूषविली. त्यांच्यावर काल संध्याकाळी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.